अंगुलीनिर्देश
अंगुलीनिर्देश
उभा युगप्रवर्तक
द्याया जन उपदेश
खल कुंठीत बुद्धी
करी अंगुलीनिर्देश
असे पाळत सहस्त्र
तयाठायी ते वैगून्य
परि स्वतः समजती
तया जगती अनन्य
आणि अपूर्ण पांगळ्या
धन्य ज्ञानास मानती
असे जगती ते शून्य
परि दुष्ट न जाणती
द्वेष अन लोभापायी
जंगजंग पछाडती
पडे सत्याची झापडी
दुष्ट श्रीमुखी पडती
परि साध्य नच होती
तयांचीया कुटनिती
सत्याचाच जय असे
अजूनही या जगती
