STORYMIRROR

Anil Rathod

Others

3  

Anil Rathod

Others

बहरूच दिले जात नाही

बहरूच दिले जात नाही

1 min
230

बहरणे हा निसर्गाचा नियम,

पण, कित्येक जीवन फुलूचं देत नाही...!

दुर्बल, वंचितावर घाव घालतात,

स्वतंत्र जगू का देत नाही?


काही कळीला उमलू न देई,

ही धरती, सूर्य, चंद्र पाहूच देत नाही....!

मानवीहक्क सहज हिरावले जाई,

कुणालाच का जाणीव नाही?


अंधश्रद्धेच्या खाईत समाज,

शिक्षणाचे महत्त्व नाही....!

शिक्षणाची औपचारिकताच,

पण कौशल्यपूर्ण का नाही? 


निर्माण होई कारकूनाची फौज,

वाढे बेकारी, गुन्हेगारी रोज...!

झोपला का समाज सारा?

का करी रात्रंदिवस नुसतीच मौज?


Rate this content
Log in