STORYMIRROR

Anil Rathod

Inspirational

3  

Anil Rathod

Inspirational

जीवनगीत

जीवनगीत

1 min
380

कधी आनंदलो, गालातच हसलो 

कधी अपेक्षा भंगाने हिरमुसलो

स्वतःशी तर कधी परिस्थितीशी झगडलो

पण कधी रडत नाही बसलो...


हेच जीवनगीत आहे

परि विना संगीत आहे

एक अनामिक भीती,

इथे प्रत्येकाच्या मनी आहे


ओढाओढी करणं तर

या जगाची रीत आहे

समजूत काढवी स्वतः स्वतःची

हेच जीवनगीत आहे


विचार मंथन करून

स्वतःचं घडवणं चरित्र आहे 

दुग्ध घुसळता नवनीत आहे

हीच जीवनरित आहे...

हेच जीवनगीत आहे...


विषय का मूल्यांकन करें
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational