शब्द
शब्द


शब्द पांडुरंग
शब्द परमार्थ
शब्द कर्म अन्
शब्द कारकार्थ
शब्द आनंदे उधाण
शब्द दुःखितां आधार
खचलेल्या मनास
शब्द देई समाधान
शब्दात आहे अर्थ
शब्दात असे स्वार्थ
शब्दानं होई अनर्थ
शब्दाने होई जीवन सार्थ
शब्दच माणसाचे वैरी
आपला परका भेद करी
शब्दाने वाढे आपुलकी
शब्दच माणसं जवळ करी
तलवार अशी ही दुधारी
काळजावर वार करी
घायाळ होई आपलीच माणसं
बोलू नये कुणा... विकारी
जपून वापरावे शब्द फार
शब्दाला असते धार
शब्दांनी दुखतात मने अपार
उपयोग करताना करावा विचार