Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Anil Rathod

Tragedy

3  

Anil Rathod

Tragedy

🌷विधवा म्हणती..!🌷

🌷विधवा म्हणती..!🌷

1 min
409


झाले सहा महिने भ्रतार जावूनी 

तरी मंगळसूत्र गळ्यात दिसलं....

वाटलं...विचारावं तिला प्रश्न

पण तिच्या स्त्रित्वानं मला टोकलं....


म्हणत असावी मनोमन धनीला 

आहे खंबीर मी उभी... बघ आजही

मुलांच्या जबाबदारी सोबतच 

तूझ्या आठवणीत रोज करते साजही


भाळेत कुंकू भरते...

ना सुवासिनी वाटावी म्हणूनी 

उद्देश एकच,नराधमांच्या 

पडू नये मजवर कुनजरा म्हणूनी 


पूजतील लोकं भक्तीभावानं 

घालुनी गोंधळ नवरात्रीचा 

पण विचार नाही करणार 

घरी अर्ध्या रात्री जाणाऱ्या स्त्रीचा


विधवा म्हणती कुणी

कुणी म्हणती चांडाळनी

अर्बट चरबट बोलती सदा 

जन करिती तिची हेटाळणी


नका देऊ साथ निदान 

जगू ध्यावं तिलाही

जश्या घरच्या माता भगिनी 

तसंच मन असतं तिलाही


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy