भक्ती
भक्ती
गुरुंच्या नामजपाचे
धन मजला मिळाले
भक्तीचामार्ग धरला
मन हे प्रसन्न झाले ||१||
भौतिक सुखाच्या मागे
धावलो सोडूनी द्वार
सोडून गेली नाती ही
तुझा मजला आधार ||२||
सत्य मार्गाने मिळाले
जीवनाचे सुख सारे
नाम जपाची ओढ ही
भक्तिमार्ग दाखवी रे ||३||
स्वच्छंद मनीचा भाव
भक्तीचा मार्ग मनाशी
नौका माझी भरकटे
माथा तुझ्या चरणाशी ||४||
