लाडका राजस लेक
लाडका राजस लेक


लाडका राजस लेक
देखणा तू सुकुमार
हास्य तुझे पाहण्यासाठी
मन माझे होई आतूर।। १।।
न्हाऊ घालते तुजला
ममता माझी प्रेमाने
ये चिमुकल्या कुशीत माझ्या
हसत हसत लडिवाळपणे।। २।।
शीण सारा जाई निघुनी
बोबडे तुझे स्वर ऐकता
नयन माझे सुखावती
नटखट तुला पाहता।। ३।।
सूख जगीचे तुला मिळावे
दु:ख न येवो वाट्याला
ओंजळीत हे दान मागते
तुझ्याचसाठी देवाला।। ४।।