नाती
नाती


नात्यांचा बाजार काळा
कुणाचा नाही कुणास लळा
आईची साथ सोडुनी
राहतो आज पोर वेगळा।। १।।
पैशांनी जुळतात नाती
पैशांनीच तुटतात नाती
भावनाशून्य जगात या
पैशांवर नाचतात नाती।। २।।
जमिनीच्या हिश्श्यांसाठी
नात्यांचे झाले हिस्से
बदनाम एकमेकांना करण्यास
नात्यांनीच रंगवले किस्से।। ३।।
आपले केले परके अन्
परक्यांच्या राहून सोबती
एकमेकांची जिरवण्यातच
धन्य मानती नाती।। ४।।