साद मनाची मनाला
साद मनाची मनाला

1 min

444
साद मनाची मनाला
हात हाती हर क्षणाला
तुझ्या सोबतीने सख्या
अर्थ आला जगण्याला।।१।।
ओठावरी तुझे गीत
हृदयामध्ये तुझी प्रीत
विसरले स्वतःलाच
प्रेमाचीही कशी रीत।।२।।
तुला पाहण्या आतुर
नजर माझी भिरभिर
मनाला ओलेचिंब करणारी
पावसाची तू रे सर।।३।।
साथ तुझी कायमची
लाभो मला जीवनात
क्षण माझे सुखावती
सख्या तुझ्या सहवासात।।४।।