लेखक कोण आहे?
लेखक कोण आहे?
लेखक कोण आहे?
ज्याच्यात एक नाही
तर अनेक पात्रे विराजमान
हे समाज पाहू शकत नाही
म्हणून तो लेखक आहे
लेखक कोण आहे?
विचार ज्याचे आहेत वेगळे
मानतात ज्याला सगळे
लावतो तर्क भविष्याचे
अन् लागतो देण समाजाचे
हे कळतं ज्याला
तो लेखक आहे
लेखक कोण आहे?
ज्याची रचनात्मकता आहे विचित्र
डोईमधे असते ज्याच्या साहित्याचे चित्र
हे जाणतो जो
तोच खरा लेखक आहे
लेखक कोण आहे?
जो जन्मतो सामान्य परिवारात
मरतो असामान्यात
हे नसते माहीत जयाला
तो आहे लेखक खरा
लेखक कोण आहे?
जो सदैव जगतो कल्पनामधे
वास्तवाशी ज्याचा संबंध नाही
अन् ज्याला आवडते हरवून जाणे त्यात
येण्यास खर्या जगात लावतो वेळ फार काळ
जो घडवतो इतिहास
होतात ज्यास भास
तोच लेखक आहे...!!!