मृगजळ
मृगजळ
सुखं शोधायला बाहेर पडलो,
अनेक पायवाटा फुटत जातात ..........
मनाला कोडी पडतात,
संयमाचे बंध मात्र तुटत जातात ........
चालता- चालता दमछाक होते,
आपल्यांचे हातही सुटत जातात .........
उरत नाही मग पंखात बळ
सुखं शोधण्याचा प्रवास
हा भासे फक्त
मृगजळ .....!!!!! -----------------------------------
