पाऊस
पाऊस
1 min
102
आज परत आलास तू
मनमोकळा बरसत
हुरहूर होतीच म्हणा
कालपासून तुझ्या येण्याची
थांबलासही.....
कितीतरी वेळ
दाराबाहेर....
सकाळ ते संध्याकाळ
बंद केलास मार्ग
माझा घराबाहेर पडण्याचा
कधीही ओलांडला नाहीस तू
उंबरठा माझ्या घराचा
आवाज मात्र सतत
दाराआडून तुझ्या असण्याचा
तू दमून निघून जाशील
असं वाटलं
मला न भेटताच
म्हणून.....
अधिरतेनं
मीच वाकून पाहिलं
दाराआडून पाहताक्षणी
तूच ओघळलास रे
माझ्या डोळ्यांतून
