STORYMIRROR

Anup Salgaonkar

Romance

3  

Anup Salgaonkar

Romance

दरवळ

दरवळ

1 min
202

रुजायचंय तुझ्या मनात

अगदी खोलवर

माझ्या विचारांचं बीज बनून

तुझ्या अंतरंगात


कळणारही नाही तुला

सोबत सहवासात

त्या बीजात आहे

माझाच अंश


अनेक पावसाळे झेलून

सृष्टीचे खेळ खेळून

उमलेल जेव्हा ते

तुझा भाग होऊन


तेव्हाच जाणवेल

तुझं तुलाच

जेव्हा तुझ्या आत बहरेल

माझ्या विचारांचा वृक्ष


फुला-पानांनी वेढून

नव्या पालवीने सजून

अन् दरवळेल तुझ्या

अवती भोवती

माझ्याच विचारांचा

दरवळ...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance