दरवळ
दरवळ
1 min
289
रुजायचंय तुझ्या मनात
अगदी खोलवर....
माझ्या विचारांचं बीज बनून
तुझ्या अंतरंगात....
कळणारही नाही तुला
सोबत सहवासात
त्या बीजात आहे माझाच अंश
अनेक पावसाळे झेलून
सृष्टीचे खेळ खेळून
उमलेल जेव्हा ते
तुझा भाग होऊन
तेव्हाच जाणवेल
तुझं तुलाच....
जेव्हा तुझ्या आत बहरेल
माझ्या विचारांचा वृक्ष
फुला पानांनी वेढून
नव्या पालवीने सजून
अन् दरवळेल.....
तुझ्या अवती भोवती
माझ्याच विचारांचा
दरवळ...
