वेडं मन
वेडं मन
1 min
297
वेडं मनझुरत राहतं
तुझ्या पाठी फिरत राहतं
कधी ओळखीच्या
कधी अनोळखी
वाटा पायदळी तुडवत राहतं .......
दिसतेसही तू गर्दीत
मला हवी तेव्हा
मला हवी तशी
तुला पाहताच
सुखाने काठोकाठ भरत राहतं .......
मानाचं अजून ते काय ???
गर्दीचा पडदा सरता
आसुसल्या नजरेनी
भेटीच्या ओढीनी
काळजीच्या भितीनी
चिंताक्रांत विरत राहतं .......
का सांगू ???
कारण .....
ते फक्त तुलाच शोधतं राहतं .......
