असंच राहू दे थोडं
असंच राहू दे थोडं
1 min
328
असंच राहू दे थोडं
तुझ्यात माझं मलाच शोधतं
आठवणींची पानं चाळत
भूतकाळ जाळत .......
उमगेल सारं काही
जे सहज हाती लागत नाही
तुझ्याच सहवासानं
माणसाला माणूस जोडत .......
सुटेल सारा गुंता
तुझा हात लागता
सापडतील सगळीच उत्तरं
कळत नकळत ......
बसू दोघं क्षणभर
आठवणी घेऊन मणभर
मी सोबत असेन
तुझी दुःख सारी खोडत ........
मग लाभेल सारं सुख
न मागताही खूप
असंच राहू दे थोडं
थोडं आनंदानं .......
थोडं गहिवरल्या डोळ्यानं...
