आठवण
आठवण
1 min
397
ती येते
अगदी आपसूक
कधीही, कुठेही
न सांगता ....
ती आल्याशिवाय राहत नाही
ती वेळ काळ पाहत नाही
कितीही प्रयत्न करूनही
ती टाळताही येत नाही
घड्याळाच्या काट्याला तर
ती जरासुद्धा घाबरत नाही
एकटं कधीच राहू देत नाही
दूर तिच्यापासून जाऊच देत नाही
वाट्टेल तेव्हा येऊन जाते
जे आहे ते देऊन जाते
स्वीकारलं कि बांधून ठेवते
धिक्कारल्यावर हरवून जाते
हसवून जाते गालातल्या गालात
कधी डोळ्यातून वाहून जाते
