STORYMIRROR

Anup Salgaonkar

Tragedy

4  

Anup Salgaonkar

Tragedy

भेट

भेट

1 min
23K

भेट तुझी माझी

कारण नसतानाच घडलेली...

माझ्याशी बोलताना

तू मात्र अवघडलेली...


त्यानंतर ते रोजचंच

तुझं दिसणं

आवडलं होतं मला

ते तू सोबत असणं...


भेटीच्या गाठी पडाव्यात

असं राहून राहून वाटतं होतं...

क्षण क्षण जपताना

आठवणींचं तळं साठत होतं...


जन्म बांधता आला नाही

मन माझं बांधलं गेलं...

कसं कळेना तुझ्या विरहात

असं जगणं नशिबी आलं...


आजही दूर तुला

नजर शोधत राहते

तू न दिसता

पापणी माझी भिजत राहते...


ओलावल्या नजरेतून

जग दिसतं धूसर

सोपं का तुला गेलं असेल

म्हणणं, "आता मला विसर..."


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy