दुष्मनीचे काटे
दुष्मनीचे काटे
नऊ महिने बाळाला
पोटात वाढविते ती आई,
बाळाला हे जग
पाहण्याची असते मोठी घाई.
एकाच आई पोटी
जे जन्म घेतात,
ते एकमेकांचे
भावंड असतात.
खेळत बागडत होतात
लहानाचे मोठे,
लग्न झाल्यानंतर का?
वाटत नाही,त्यांना
एकमेकांशिवाय एकटे.
संसारात जातात
गुंतत आपापल्या,
का
नाहीत जात
एकमेकांच्या भावना
जपल्या?
जेव्हा त्यांची मुले होतात
कुटुंबात कर्ती,
मग का,दुश्मनीचे काटे
पसरतात एकमेकांच्या
वाटे वरती.
का येत नाहीत त्यांना
लहानपणीच्या गोड आठवणी,
एक नाही दिसला तर
दुसऱ्याच्या डोळ्यांत
का साठत नाही
पाणी?