स्ट्रॉबेरी
स्ट्रॉबेरी
1 min
335
हिरवा शालू,
न चोळी कशी लाल,
अन् त्यावर पांघरुनी
रेशीम शाल.
नवी नवरी जणू
शिवारात उभी,
पाहता हर्षीले
चांदणे नभी.
रस-रशीत ओठ
ते टचकदार लाल,
जवळी जाता उमजते
कशी नाजुक ती चाल.
नाजुक असे
तिचा बांधा,
माधुर्याने परीपुर्ण ती
न येता कोणती बाधा.
ऐसी उभी डौलात
शिवारी,
रस-रसशीत अन्
लालभडक स्ट्रॉबेरी.