पावनभूमी
पावनभूमी


हिंदुस्थान,हिंदुस्थान..
आमच्या हृदयात
आहे उच्चस्थान,
साऱ्या जगात आहे
खुपच महान.
हिंदुस्थान,हिंदुस्थान..
आमचं काश्मिर आहे
देशाची शान,
आमचे सैनिक आहेत
जीव की प्राण.
हिंदुस्थान,हिंदुस्थान..
येथील शिक्षक आहेत
भविष्याची कमान,
येथे आहेत सर्व
जाती -धर्म समान.
हिंदुस्थान,हिंदुस्थान..
देशभक्तीची आहे
आम्हाला तहान,
उफाळून येते देशप्रेम,
मग असोत लहान-
सहान.
हिंदुस्थान,हिंदुस्थान..
शेतकरी करतो,
रानाची राखन छान,
रावण मारण्या श्रीराम
सोडतात एकच बाण.
हिंदुस्थान,हिंदुस्थान..
शिवबामुळे पावन येथील
मातीचा कण,
अशा पावन भुमीला
आमचे शतशः नमन,
आमचे शतशः नमन.