ज्वालामुखी
ज्वालामुखी


रोज तुझ्यावर होत असतो अत्याचार
तरी तुला न्याय मिळत नाही
तुझ्या वेदनांचा मोर्चा काढूनही
अत्याचार थांबत नाही
सजवत असताता तुझ्यावर झालेल्या अत्याचारच्या बातमीने पेपरचे रकाणे
आणि टिव्हीवर दिर्घ चर्चा होत रहाते
तू मात्र निशब्द होवून
जिवंतपणी मरण पहाते
या माणसांच्या गर्दीतल्या पहात असतात कितीतरी विटालेल्या नजरा तुझ्याकडे
आणि तुझे शापीत जगणे तू साभांळून घेते
कळतात फक्त त्या मेणबत्तीलाच
तुझ्या गर्भार जखमा
म्हणून ती स्वतःला जाळून घेते
पण तू आता नको उभी राहूस त्या न्यायकक्षेच्या कठड्यात
करू नकोस न्यायासाठी विनंती
त्या न्यायदेवतेलाही
त्या तराजूच ओझं झाल आहे.
तेव्हा तुझ्यात दडलेल्या ज्वालामुखीला बाहेर काढून
तू एकदाच हो रणचंडिका
आणि त्याच न्यायकक्षेत छाटून टाक हातपाय त्या नराधमांचे
तेव्हांच सुटेल त्या न्याय देवतेच्या डोळ्यावरची पट्टी
तू केलेला न्याय बघण्यासाठी