सांगना रे देवा....!
सांगना रे देवा....!
सांगना रे देवा, असा का झालास तु निष्ठुर..?
संसार गेला वाहून माझा, आला नदीला पूर..!
उभ शेतच माझे, गेलय त्यात सार वाहून..!
नाही पाहिलंस तू, डोळे का घेतलेस झाकून..?
काळ पडलं सोयाबीन, जागीच फुटलय कोंब..!
उसळला पोटात आगडोंब, आता मारू कुठे बोंब..!
कोठून मिळणार आता, सडलेल्या धानाला उतारा..?
घशाला पडली कोरड, उघड्यावर सारा पसारा..!
सर्जा-राजाला माझ्या, कुठून आणू चारा पेंडी..!
झाली मनाची घालमेल, झाली सारीच कोंडी..!
घडी संसाराची माझ्या, आता विस्कटली सगळी..!
लेकीला माझ्या आता, कशी करू साडी चोळी..!
सांग देवा आता, कशी करू दसरा दिवाळी..?
होळी पेटली संसाराची, झालीरे राख रांगोळी..!
सांगना रे देवा..!
