मीच तुझी सावली
मीच तुझी सावली
1 min
190
मीच तुझी सावली, मीच तुझी छाया..!
करूनी विचार भविष्याचा, दाखवा थोडी दया…!
डोंगर माथा कोरून, तू जरी बनवल्या वाटा…!
सरतेशेवटी तुझाही, यामुळेच निघेल काटा…!
रौद्ररूप धारण करती, माझे सखे सोबती..!
जणूकाही गजराजाच्या कर्णात, एक चिवटी..!
समृद्धीच्या नावाखाली ,करता माझा संहार..!
मग मोडतात अनेक ,घरट्यांचे संसार..!
माझ्या कुशीत येता, होई पक्षिणी निवांत..!
मग शोधतात तुम्ही, माझा, कुठेतरी एकांत..!
नका चालवू हृदयावरी, पाशवी कुऱ्हाड..!
कारण भविष्यात होईल, सर्व काही उजाड..!
करा माझे संवर्धन, तेव्हा होताल सधन..!
नाहीतर ओघात काळाच्या, होईल तुमचे पतन !
