तू असताना
तू असताना
तू असताना ग्रीष्मातही शीतल छाया
तुझ्या स्पर्शाने उजळती काया
तू असताना सारा आसमंत फुलतो
जणू काही बकुळीचा सुगंध दरवळतो
तू असताना मन मंत्रमुग्ध होई
असे वाटते सोबतीला जाई-जुई
तू असताना जणू सरिता सागर मिलन
मग पर्वतही भासे राई समान
तू असताना शशी देखील लाजतो
तूच माझी चंद्रिका असा भास होतो
तू असताना नभात पाखरांचा थवा
फुलावरील भ्रमर करतो तुझा हेवा
तू असताना…