कलेवर
कलेवर
आज माझ्या कलेवरावर
थोडी सुमने अर्पण कर
थोडी रंगीत नी सुगंधीत
जस तुझ्या माझ्या नात्यातलं
प्रेमळ संगीत
आज माझ्या कलेवराचे
तू अंतिम दर्शन कर
माझ्या डोरल्यातला एक मणी
माझ्या ओठी अर्पण कर
माझ्याशी जुळलेल्या नात्यांची
तूच आता राखण कर
माझ्या अंतयात्रे समयी
आठवणींच्या अश्रूफुलांची
तुझ्या डोळ्यातून उधळण कर
या संसाराच्या रहाट गाडग्यांचा
तूच एकटा सारथी बन
आज माझ्या कलेवरावर
अग्निफुलांचा वर्षाव कर
आज माझ्या कलेवरावर
थोडी सुमनं अर्पण कर
