STORYMIRROR

Ranjana Khedkar

Others

4  

Ranjana Khedkar

Others

जागर माय मराठीचा करूया

जागर माय मराठीचा करूया

1 min
264

शब्दधनाचा वारसा लाभला 

ज्ञानार्जनाने उजळल्या ज्योती 

शब्दसागरी गवसलेत अलौकिक 

मराठीच्या शिंपल्यात साहित्य मोती 


संस्कृत भाषेचा घेवून आधार 

देवनागरी म्हणती तिचे स्वरूप 

ग्रंथ समूळ आलेया जन्मासी 

ओढून मराठीचे सुंदर लिपिरूप 


वेद उपनिषदांचे करता अध्ययन 

दिसते दडले संस्कृताचे रे सारं 

श्लोक,ओवी, लीळांनी झाली समृद्ध 

विविध रसांचा मराठीने केला शृंगारं


अभंग, पोवाडे, भारूड, हरिपाठ 

आणि लोकगीते, कवणस्वरूपात 

ज्ञानदेवानी रचला पाया मराठीचा 

सर्व करूया जागर आणू अमलात 


करू संवर्धन मायबोली मराठीचे

आपल्या संस्कृतीचे करूया जतन 

मराठीचा विकास जबाबदारी माझी 

प्रचार प्रसारासाठी करू यत्न, प्रबोधन 


Rate this content
Log in