STORYMIRROR

Ranjana Khedkar

Romance

2  

Ranjana Khedkar

Romance

प्रित

प्रित

1 min
41

युगेंयूगे असावी अशी सुंदर

निवळलेली भोवताली हवा 

स्वच्छ धुतल्या काचे आडून 

प्रीतीचा हा उजळला दिवा 


प्रित फुलावी हळुवार पावलांनी 

मनाच्या खोल गाभाऱ्यात रुजावी 

दुःखाच्या विषारी दाट अंधाराला  

हलाहल सारखं हळूच गिळून उरावी 


आली प्रेमाचा लेवून शेला 

पुन्हा कर सुरवात नव्यानं 

विश्वासाची कळी उमलली 

पुन्हा ये तू सारं विसरून 


वेदनेचा काहूर शांत होईल 

फुंकर घालशील जर प्रेमानं 

गहिवर संपेल त्या जखमांचा 

चंदनाच जणू त्यावर लेपण 


प्रीतीचं सप्तरंगी इंद्रधनू दिसेल 

नीलवर्ण होईल सारं नभांगण 

अवघी सृष्टी करेल स्वागत 

होई जेव्हा अद्भुत मिलन


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance