महाशिवरात्री (षडाक्षरी )
महाशिवरात्री (षडाक्षरी )
पूजा शिव गौरी
आली शिवरात्री
विवाह सोहळा
अमावस्या रात्री
सनई चौघडे
देव नंदी गण
उमा शंकराचे
विवाह बंधन
धूप दीप भोग
करूया अर्पण
जागरण, संगे
भजन कीर्तन
मंडप तोरण
पाचपावलीचा
हर हर शंभू
जागर देवाचा
कढई प्रसाद
नारळ, कंदाचा
होम हवनात
गंध कपूराचा
द्वादशी पारणे
नाम संकीर्तन
जीव शिव भजू
सर्व आनंदानं