STORYMIRROR

Ranjana Khedkar

Tragedy

3  

Ranjana Khedkar

Tragedy

आंदण

आंदण

1 min
159

का ? येतो वारंवार 

हा घेरावाचा काळ 

कुणास ठाऊक कधी 

थांबेल भावनांचा जाळ 


 सप्तपदी सात वचन 

 का ? व्हावे निरर्थक 

अधरावरचे हसू हिरवण्यास 

नशीब करी प्रयत्न सार्थक 


रक्तबंबाळ मनाला हळूच 

 चढता आशेची खपली 

 का रक्तांच्याच नात्यांनी  

परत परत ओरबडली 


सर्वत्र सांत्वनाचे मुखोटे 

सुंदर दयेची रंगरंगोटी 

भिकेच्या झालरी भरजरी 

मजभवती सारे आपलपोटी 


एक मुखवटा पडला गळून 

निरागस छाया घाले रिंगण 

क्षणार्धात केले दुःख मुक्त 

मृत्यूने दिले सुखाचे आंदण 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy