देखणी लेखणी (अष्टाक्षरी )
देखणी लेखणी (अष्टाक्षरी )
झाली लेखणी देखणी
प्रसवून शब्द मोती
भाव विखुरे कागदी
प्रगटे अर्थांच्या ज्योती
शब्द शब्द गुंफताना
बघ जाई मोहरून
काव्यमय होई मन
अर्थ येता बहरून
नाविन्याचा ओढे शेला
साज शृंगारे नटली
माझी लेखणी देखणी
ठायी कल्पकता रुजली
माझ्या लेखणीची गाथा
लाभे तिज अमरत्व
शब्द उधळीत जाई
तिचे अबाधित सत्व