मला तुझे भास नको....
मला तुझे भास नको....
मला तुझे भास नको
तू हवी होती......
माझ्या येणाऱ्या प्रत्येक
क्षणात साथ तुझी हवी होती
मला तुझे भास नको
तू हवी होती......
झिमझिमणाऱ्या पावसात तुझी आठवण नको
प्रत्यकक्षात तूच हवी होती
मला तुझे भास नको
तू हवी होती......
शरदातल्या चमचमणाऱ्या चांदण्यात
गुलाबी थंडीची प्रित झुळूक नको तुझ्या प्रेमाची उब हवी होती
मला तुझे भास नको
तू हवी होती......
माझ्या हृदयाच्या प्रत्येक स्पंदनाला
तुझ्या प्रेमाची धडधड हवी होती
मला तुझे भास नको
तू हवी होती......
माझ्या आनंदाच्या प्रत्येक क्षणात
तुझी उपस्थिती हवी होती
मला तुझे भास नको
तू हवी होती......
या वेड्या जीवाला एक जीव लावणारी
प्रित वेडी हवी होती
मला तुझे भास नको
तू हवी होती......
माझ्या डोळ्यांतून तुझ्या प्रेमाची ओघाळणारी
भावना पाहायला तू हवी होती
मला तुझे भास नको
तू हवी होती......

