देवी काळजी घे
देवी काळजी घे
आलं हे कोरोना संकट
होणार नाही ग दर्शन,
केलय बंधन साऱ्या जगा
तुझ्या भेटीला ना येई कोण,
देवी काळजी घे आमुची।।१।।
कोरोना विषाणू जगाला छळी
आली मरणाची ग वेळ,
डोळ्यासमोर जाती आपुले
नाही होत ग शेवटची भेट,
देवी काळजी घे आमुची ।।२।।
घेई हे संकट तूझ्या ग पदरी
रक्षी ग साऱ्या जगाला,
हात जोडूनी विनंती करते
संभाळ ग तूझ्या लेकरला,
देवी काळजी घे आमुची ।।३।।
कर ग मुक्त मंदिरे सारी
वाजु दे मृदुंग वीणा टाळ,
नाचु खेळू दे तूझ्या अंगणी
घुमू दे तुझा गगनी नाम घोष,
देवी काळजी घे आमुची ।।४।।
