नारी शक्ती
नारी शक्ती
*स्त्रीच्या* उदरातून जन्म घेते दुनिया
ह्या विश्वशक्तीचे नाव असे हो *नारी*
शक्तिपीठ नवदुर्गेचे ती भक्तीची उगम
स्त्री विठूची रुखमायी आषाढीची वारी
स्त्री असे ती देवाची सुंदर *प्रतिकृती*
लावण्यवती असे *ममतेची* खाण
जगाची आदर्श अशी ती *शालीन*
उदांत विचारांची *सुसंस्कृतीची* गती
स्वतःभोवती घाली मर्यादेच *कुंपण*
करूनी अंगणात सौख्याचं *शिंपण*
*मातृत्व* स्विकारुन घेतले बाईपण
*कृतार्थ* करी स्त्रीला ते *आईपण*
नसे गौण स्त्री दासी ती *उपभोगाची*
शिव-पुरुष *स्त्रीशक्ती* सम गुणांची
ती धरी आस संसाराच्या *प्रगतीची*
स्त्रीशक्ती करीतसे उन्नती *जगाची*
वेळ देई *छंदास* जोपासी मी पण
जपते मनापासून ती घराचे *घरपण*
तिच्या मनी गुरफटले ते *माहेरपण*
आठवणी संग जपते तिचं *बालपण*
