आई
आई
1 min
253
रक्ताचं तुझिया करुनी पाणी
आई तु संभाळीशी श्रमुनी उदरी,
माझ्या हृदयाची असशी हाक तू
माझी आई भासे पंढरीची वारी..
माया तुझी मनात दिसे ओंजळभर
स्थान तिला निःशब्द आशा नभी
तुझ्या पंखातून घेतली नेहमी भरारी
दुधाळ तुझ्या सावलीत आहे मी उभी..
आई तुझे मनी गात असे अक्षयगान
जगी या तूच माझी आभाळमाऊली,
तुझिया हाताने घेतलेसे कर्णाचे दान
सुखा-दुःखात माझिया तुझी सावली..
आई तु असशी एक फुलाची पाकळी
सुगधं देतसे साऱ्यांना सतत उमलुनी,
अपराध मुलांचे नेहमी पोटात घालुनी
स्वतःसाठी न जगे आई परोपकारुनी..
