नको निराशा
नको निराशा
दुःखाचे डोंगर घेऊन
असा बसलास का माणसा
दुःखातूनही मार्ग निघतो
आता नको ही निराशा
नैराश्य मानवतेचा
सर्वात मोठा शत्रू आहे
त्यातून पडण्याचा एकच मार्ग
तो तुझ्या अंगी दडला आहे
हरलास म्हणुनी काय झाले
हीच तर जिंकण्याची सुरुवात आहे
दमलास असशील बहुतेक
मात्र यावरही पर्याय आहे
तू एकटाच यात अडकला नाही
असे भेटतील कित्येक रस्त्यात
प्रत्येकाच्या प्रश्नांचा उत्तर
असतो रे तुमच्याच बस्त्यात
सांगूनही तुला कळणार नाही
ती तुलाच शोधायला हवी
जीवन म्हटले तर सुख दुःख आलेच
फक्त ती तुला ओळखता यायला हवी...!
