STORYMIRROR

Punaji Kotrange

Tragedy

3  

Punaji Kotrange

Tragedy

का! बापू देशासाठी...?

का! बापू देशासाठी...?

1 min
343

दूर कुठूनतरी आफ्रिकेतून

शांततेचे वावटळ आले

नाव होते त्यांचे मोहनदास

लोक त्यांना बापुूम्हणाले


कोण होता तो माणूस

त्यानेच का सत्याग्रहाचा नारा दिला!

कळलेच नाही अजूनपर्यंत

कोणत्या प्राण्याला सहारा दिला


मला नाही वाटला कधी 

झाला माझा देश स्वतंत्र

आजही होतो मजवर अत्याचार

प्रश्न पडतो! हाच का तो स्वतंत्र?


कोणासाठी लढला तो महामानव

अजूनही मला कळले नाही

भारत देशात असूनसुद्धा

मला ना छळले; असा दिस गेला नाही!


का! बापू देशासाठी प्राण अर्पिले?

फक्त जयंतीच्या दिशी तुला प्रणाम केले

दिसत नाही तुझे देशाला दिलेले सूत्र

समोर तरी मिळेल का! देशाला खरा स्वतंत्र?


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy