STORYMIRROR

Punaji Kotrange

Inspirational

2  

Punaji Kotrange

Inspirational

नाती गोती

नाती गोती

1 min
72

ओस पडली इथे 

गाव, खेडी आणिक माती

कुठे आसरा मिळणार आता

सोडुनी नाती गोती


भेदाभेद - अस्पृश्य जिवन त्यांचे

कोणासंगे कोण टिकती

किती कमविलास किती खर्ची घातलास

कोण इथे तुला विचारती


सर्व द्रवाचे भुके इथे

ना वेळ यांना नात्यांचा

विसरत चालला आज माणूस

मांडला खेळ पैशाचा


पैसा - पैसा करतो मानवा

ही वेळ आहे माणुसकीची

संबंध जरी साजरे असले तरी

ना देणार साथ मदतीची


पैसाच आज देव ठरला

आता भिती नाही मजला

म्हणतो आज शहाणाही

पाहिजे नाती - गोती कशाला


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational