STORYMIRROR

Punaji Kotrange

Inspirational

2  

Punaji Kotrange

Inspirational

घेऊनिया शपथ आईची

घेऊनिया शपथ आईची

1 min
52

माय माझी माऊली

दिन दलितांची ती साऊली

शिकण देण्या स्त्रियांना

दिवस रात्र झिजली


क्रांती ज्योती उभे पाठीशी 

घेऊनी शिक्षणाची तलवार

उचलला विडा त्यांनी

करण्या स्त्रियांस साक्षर


झेलला मार मायेने

सहन केला अत्याचार

याची भरपाई करुया आता 

बनवूया देश साक्षर


घेऊनिया शपथ आईची

नेऊ राष्ट्र प्रगतीपथावर

शिक्षण देऊनी मुलींना 

पोहचवू त्यांच्या ध्येयावर


शिक्षणाचे बीजे पेरुनिया

हरवूया या अज्ञानतेला

हाच ध्यास मनी ठेऊनी

सक्षम बनवूया भारत देशाला....!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational