STORYMIRROR

Punaji Kotrange

Inspirational

2  

Punaji Kotrange

Inspirational

लालपरी

लालपरी

1 min
44

एस टी चा प्रवास सुखाचा प्रवास

असे सांगत फिरी शासन

मात्र कर्मचाऱ्यांच्या घरी आज

ना मिळेनासे झाले राशन


संप, मोर्चे, धरणे, आंदोलन

सारे धुडकावून लावले

त्यातूनही मार्ग ना निघला तर

सेवेतून त्यांना कमी केले


महामारीत साऱ्या कर्मचाऱ्यांवर

आली होती उपासमारी

कसे काढले असतील दिवस त्यांनी

विचारातच उठतो काटा उरी 


होती लालपरीची मज्जा ती

आगळी वेगळी निराळी

खासगी गाड्यांची आत्ता

वाढली मजल लय भारी


वाटू लागले आता असे

की, लालपरी इतिहासातचं लपणार

सुख - दुःखाची एक सोबती

का रस्त्यावरुनी लुप्त होणार?


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational