STORYMIRROR

Punaji Kotrange

Others

3  

Punaji Kotrange

Others

वसंत बहार

वसंत बहार

1 min
204

मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी

फुलला वसंत बहार

तुजसाठी प्रिये बांधू वाटतो

ताजहूनही सुंदर मिनार


फुलासारखी कोमल तू

ठेवावे जपून तुला

तुझ्या डोळ्यातील अश्रू

टोचती काट्यापरी मला


या प्रितीच्या रंगमहालात

बांधू ग तोरणे विश्वासाची

आली जरी लहर काळोखातली

उभी राहू धरून पकड मनाची


स्वर्गापेक्षाही सुंदर 

वाहील इथे प्रेमाचा झरा

बघूनी आम्हां विसरतील सारे

लैला - मजनू चा धडा....!


Rate this content
Log in