बळी
बळी
अंत: करण भरून आले
किती पडणार दुर्दैवी बळी
इथे तिथे हजारो झाले
कोमेजली ती फुलांची कळी
हात रंगलेले रक्तानी सारे
वासनेची भूक हि उदरी
दृष्ट माणुनी सदैव जाळती त्याले
मग हा कसा मोकाट फिरी
वारा सुटला वणवे पेटले
हि आग कसी विझणार सारी
धग धगत्या जीवना वाटे
किती होतील हानी
अंत: करण भरून आले
किती पडणार दुर्दैवी बळी
