STORYMIRROR

Swati Mali

Tragedy

3  

Swati Mali

Tragedy

अशा एका सांजवेळी

अशा एका सांजवेळी

1 min
313

 अशा एका सांजवेळी

वासरांच्या ओढीने गाई

   गोठ्याकडे परततात...

दमले भागले जीव आपल्या

   घरामध्ये विसावतात...

चोचीमध्ये खाऊ घेऊन 

   पक्षी घरट्यात येतात...

सागर किनारी गुंतलेले जीव

   स्वप्ने पाहण्यात गुंगतात ..

नंदादीपाची ज्योत तेवताना

   हात जोडले जातात..

शुभंकरोति कल्याणम चे सूर

   कानी घुमत राहतात...

विविध रंगी भाव भावना

  चराचरा व्यापून टाकतात...


 अशा एका सांजवेळी

 तुझ्या आठवणी माझ्या      

   सभोवती पिंगा घालतात...                   

जगाच्या या गर्दीत मला

  एकटे करून सोडतात....

जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी

   भास तुझे सतावतात......                 

स्वप्नाचे रचलेले मनोरे

   नजरेत उभे राहतात..

भंगलेल्या दुःखी जीवास

  घायाळ करून जातात....


 अशा एका सांजवेळी

किती तरी प्रश्न वेड्या मनास

  सतावत राहतात...

माहीत आहे असेच भाव

  तुझ्या ही मनात विहरतात..

मग धुंद सांजवेळी नकळत

  पापण्या का ग झरतात....

तुझ्या ही आणि माझ्याही....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy