तू स्वामिनी.तू मानिनी
तू स्वामिनी.तू मानिनी
हृदयी अमृत नयनी पाणी
तुझ्या स्त्रीत्वाची जुनी कहाणी..१
भिडेवाड्यात क्रांती घडली
शिक्षण गंगा अवतरली..२
जीवनात लाभे संजीवनी
ज्ञानमृत पडले पचनी..३
चूल नी मूल पलीकडचे
विश्व निर्मिलेस तू स्वतःचे..४
आकाश पाताळ भुईवर
दरवळे कर्तृत्व बहर..५
आत्मविश्वासाने खुलतेस
नाती जपत बहरतेस...६
कन्या, माता,आजी तू बहिण
जपते साऱ्या नात्यांची वीण..७.
घेतलीस गगन भरारी
संघर्षाला सलाम गं नारी..८
तू सखी,, भार्या,,तू अर्धांगिनी
विश्व निर्मिणारी तू स्वामिनी..१०
तुझ्या स्त्रित्वाची नवी कहाणी
रचलीस तू गं सौदामिनी..११
त्रिखंडात निनादते कीर्ती
नमन तुला वात्सल्यमूर्ती...१२
