STORYMIRROR

Swati Mali

Others

3  

Swati Mali

Others

हम होंगे कामयाब

हम होंगे कामयाब

1 min
514

हम होंगे कामयाब

विसरला.. असेल 'तो'

एक.. अंगच देण्यास

पण...दिल्या त्याने कला

बहरून...जगण्यास...१


नाही ...लाभले जे काही

त्याची.. न करता खंत

आहे... त्यातून फुलती

दिव्यांग हे..गुणवंत...२


आनंदाने...जगण्यास

येती..किती अडचणी

हम होंगे ..कामयाब

आत्मविश्वास..हा मनी...३


दिव्य.. दृष्टी दिली जिने

साऱ्या.. अंध बांधवांना

शोध...लावला लिपीचा

नमन.. लुई ब्रेल ना...४


अपघात.. होऊनही 

सुधाताई.. न खचल्या

नृत्य कला...प्रेमापोटी

पुनश्च ..उभ्या राहिल्या..५


थोर...स्टीफन हॉकिंन्स

यांना... जडला आजार

होत... नसे हालचाल

परि... न मानती हार..६


मनी..ठेवूया आदर्श 

सुप्रसिद्ध...या व्यक्तींचा

जरी..असती दिव्यांग

फुले..मळा जीवनाचा..७


व्यथा,,जाणुनिया त्यांच्या

मदतीचा..हात देऊ

भाग..असे आपलाच

सामावून.. तव घेऊ..८


अपंग.. 'दिन' असला

तरी नाहीत ..ते ' दीन '

संघर्षाने.. साकारती

जीवनाचा..क्षण क्षण .९


Rate this content
Log in