फुलू दे मनी वसंत
फुलू दे मनी वसंत
नव्या..... आकांक्षाचे रूप
लेवुनिया ...बहरतो
व्यथा.... जुनी झटकून
ऋतू... वसंत फुलतो...१
पानाआड... लपूनिया
कळी... मोगऱ्याची खुले
मोहराने... गंधाळून
आमराई ...छान फुले...२
दूर... माळावर तिथे
उभा ....पळस जोमात
सडा... केशरी रंगाचा
उर्मी ....भरतो मनात...३
निसर्गाची... मुक्तहस्ते
नाना रंगी.... उधळण
नव्या... कोवळ्या पानात
हरखून....जाते मन...४
हेवेदावे ...विसरून
प्रेम रंग.. उधळूया
गुढी...हर्षाची उभारू
क्षण...साजरे करूया...५
ऋतुराजा... सम सारे
मने..वसंत करूया
पानगळ ...झटकून
पुन्हा...नव्याने जगूया...६
