STORYMIRROR

Swati Mali

Tragedy

4  

Swati Mali

Tragedy

मी वनवासी

मी वनवासी

1 min
262

जन्मा येताच नकोशी

नकोशी माता पित्याला

सुरू झाला वनवास

वनवास पुजलेला...१


पतीच्या सदनी सुख

सुख स्वप्नी ही न मिळे

सोसताना सारे भोग

भोग शब्दांत ओघळे...२


अन्यायाविरुद्ध ऊभी

ऊभी राहिली माऊली

अनाथांचे पाही दुःख

दुःख सोसण्या धावली..३


ममता बाल सदन

सदन केले स्थापन

गरजूंना अनाथांना

अनाथांना ते अर्पण..४


मी वनवासी म्हणत

म्हणत आयुष्य वेचले

माया ममतेचे छत्र

छत्र आज हरपले...५


तळपत्या उन्हातली

उन्तली तू सावली

जगायला शिकवले

शिकवले तू माऊली..६


भूक तान्ही असताना  

असताना घास गेला

जगणे देणारा श्वास

श्वास हा पोरका झाला..७


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy