ऋतू गुलाबी
ऋतू गुलाबी
अवनीवरती... सजे
दाट..धुक्याची चादर
सूर्य... चोरलाय कोणी
कसा....उमगे प्रहर....१
झाडाखाली.. दिसे सडा
जर्द.. पिवळ्या पानांचा
हुडहुडी.. भरणारा
ऋतू हा.. पानगळीचा..२
बळीराजा...आनंदून
करी..रब्बीची लागण
काळया.. आईच्या गर्भात
नव बीज..अंकुरण..३
शेकोटीच्या... ऊबेसंगे
रंगतात... गप्पा गाणी
उबदार.. गोधडीत
सामावल्या.. आठवणी..४
वाटे..हवासा गारवा
ऋतू..गुलाबी भेटीचा
शहारल्या..स्पर्शातून
धुंद..क्षण जपण्याचा..५

