आराध्य दैवत राजे
आराध्य दैवत राजे
बेड्या....गुलामगिरीच्या
राजे.. झुगारल्या तुम्ही
काय..असते स्वराज्य
आज.. शिकतोय आम्ही ..१
वय जरी..होते छोटे
मनी..निश्चय महान
किल्ले...तोरणा जिंकून
सुरुवात..केली छान..२
कला..गुणांची पारख
नसे..जातीपाती स्थान
हर एक.,..शिलेदार
स्वराज्याचा...अभिमान...३
मावळ्यांच्या..मनोमनी
स्वाभिमान.. रुजवला
गड..कोटांवरी ध्वज
दिमाखात... लहरला...४
रयतेच्या...रक्षणार्थ
उभे..आयुष्य वेचले
जनतेच्या..कल्याणास
सारे..जीवन वाहिले..५
हर हर..महादेव
स्फूर्तीदायी.. ललकारी
प्रजाहित ..दक्ष राजा
नृप..हो.कल्याणकारी..६
माता.. मानावी पर स्त्री
दिली..थोर शिकवण
घ्यावे .जाणून चरित्र
व्हावे.. सम आचरण..७
कीर्ती.. निनादे त्रिखंडी
मनी..फक्त एक मूर्ती
माझे....आराध्य दैवत
राजे..शिव छत्रपती...८
