आली दिवाळी
आली दिवाळी
अंगणात सजे सुरेख रांगोळी
दृढ करण्या नाती आली दिवाळी...१
आकाश कंदील शोभे दारोदारी
फराळाची लगबग घरोघरी... २
शेव,अनारसे नि शंकरपाळी
बुंदी,चिवडा,लाडू सजली थाळी...३
सोनियाच्या पावलांनी लक्ष्मी आली
पाहूनिया साज छान सुखावली..४
माहेरात विसावल्या लेकी बाळी
प्रेमभावे खुलते नात्यांची कळी..५
माता,भगिनी,पत्नी स्त्रीत्व सन्मान
तीच खरी गृहलक्ष्मी ठेवू मान..६
वंचितांना देवू घासातला घास
टिपू चेहऱ्यावरचा क्षण खास...७
भान पर्यावरणाचे सारे ठेवूया
प्रदूषण मुक्त दिवाळी करूया..८
निराशेचा अंधार टाकू भेदून
ठेवू आशादीप मनात जपून..९
